निलंग्यात पर्जन्यवृष्टीसाठी आयोजित केलेल्या यज्ञात चेंगराचेंगरी !

पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अनर्थ टळला

लातूर | जिल्ह्यातील निलंगा येथे पर्जन्यवृष्टीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी महायज्ञाचे आयोजन केले होते . या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. मात्र अचानकपणे वाढलेल्या गर्दीमुळं यज्ञ मंडपात अचानक चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. सुदैवानं यात कोणालाही गंभीर इजा झाली नाही. पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

जिल्ह्याचे पोलीस उपाधीक्षक हिंमत जाधव यांनी स्वतः गर्दीत जाऊन अनेकांना चेंगराचेंगरीतून बाहेर काढलं. नियोजनाच्या अभावामुळं याठिकाणी भाविकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागला. एकीकडे पूरग्रस्त परिस्थिती त्यात पालकमंत्री या महायज्ञात कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. त्याऐवजी हा निधी पूरग्रस्त किंवा दुष्काळग्रस्तांना मिळाला असता तर जनतेला समाधान मिळाले असते असे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी एएम न्यूजशी बोलताना सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies