गोरगरिबांच्या हक्काचे स्वस्त धान्य काळ्या बाजारात, तांदळाच्या 40 गोण्या पोलिसांकडून जप्त

गंगापूर पोलासांनी 40 तांदळाच्या गोण्यासह वाहतूक करणारे वाहनही केले जप्त

गंगापुर । गोरगरीबांसाठी नेहमी आधार ठरणारा असतो तो रेशन दुकान. याच दुकानातून अनेक गोरगरीब जनता आपले पोट भागवत असतात. परंतु अनेक दुकानदार जनतेला कमी प्रमाणात धान्य वाटप करतात व चढ्या भावाने बाजारात विकतात असाच प्रकार घडला आहे औरंगाबादेतील गंगापूर तालुक्यात.

गंगापूरहून 40 तांदळाच्या गोण्या घेऊन जात असतांना कायगाव या ठिकाणी गंगापुर पोलासांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेची माहिती बुधवारी दुपारी 3 वाजता अन्न,पुरवठा विभागाला देऊनही, संबंधित काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिकअप गाडी क्रमांक MH.17.2769 या वाहनामध्ये स्वस्त धान्य दुकानातील 40 गोण्या तांदूळ जप्त करण्यात आला असल्याचे पुरवठा अधिकारी गंगापुर यांना पत्र देण्यात आले आहे. संबंधित घटनेचा पंचनामा करुन आतापर्यंत पुर कार्यालयाचा कोणीही अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी दुसऱ्यादिवशीही आलेले नाही. गुन्हा दाखल कोण करणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.AM News Developed by Kalavati Technologies