CBI ची टीम उद्या मुंबईत दाखल होणार; सुशांतच्या घरचीही करणार पाहणी?

सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आला असून, उद्या सीबीआयची टीम मुंबईत दाखल होणार आहे

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने आता सीबीआयकडे सुपुर्द केला आहे. सीबीआयची टीम उद्या मुंबईत येऊन सुशांतच्या घराची तपासणी करणार आहे. त्यानंतर सीबीआय मुंबई पोलीसांनाही भेटणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.  दरम्यान सुशांतसिंह राजपूत प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सुपुर्द केल्याने, सीबीआय आता चौकशीला लागली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून, सीबीआय एसआयटीची टीम उद्या मुंबईत दाखल होणार आहे. या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी सीबीआयने एसआयटीची स्थापना केली आहे. या टीममध्ये 2 एसपी आणि 1 तपास अधिकाऱ्याचा समावेश असणार आहे. ती टीम मुंबईत दाखल झाल्यानंतर सुशांतच्या घराचा तपास करणार आहे. त्यानंतर मुंबई पोलीसांची सुद्धा भेट घेणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies