CAA Protest । उत्तरप्रदेशमध्ये मृतांचा आकडा 18 वर, 263 पोलीस जखमी

यूपीच्या 21 जिल्ह्यांमध्ये सोमवारपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

नवी दिल्ली । नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (सीएए) च्या विरोधात निषेध सुरूच आहे. या कायद्यासंदर्भात उत्तर प्रदेशात हिंसक निदर्शने पाहायला मिळाली. या निदर्शनांमध्ये मृतांचा आकडा 18 वर पोचला आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये जखमी पोलिसांची संख्या 263 वर पोहोचली आहे. यात गोळी लागल्याने 57 पोलिस जखमी झाले.

नुकतेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले की, निषेधाच्या वेळी ज्यांनी सरकारी मालमत्तेची हानी केली आहे त्यांना ओळखले जाईल आणि त्यांची संपत्ती जप्त केली जाईल आणि नुकसानीची परतफेड केली जाईल. हे लक्षात घेता सरकारने दंगली करणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू करणाऱ्या 4 जणांची टीम तयार केली आहे. ही टीम सरकारी मालमत्तेच्या नुकसानीची माहिती घेईल आणि पुढच्या टप्प्यावर कारवाईस प्रारंभ करेल.

यूपीच्या 21 जिल्ह्यांमध्ये सोमवारपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात पसरलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 263 पोलिस जखमी झाले आहेत. 57 पोलिसांवरही गोळ्या झाडल्या गेल्या, निदर्शकांनी त्यांना गोळ्या घातल्या आहेत. आत्तापर्यंत 405 रिव्हॉल्व्हर्स व कट्टे जप्त केले आहेत.

एका आकडेवारीनुसार, शनिवारी रात्रीपर्यंत 5400 निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये 705 लोकांना तुरुंगात पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निदर्शकांनी 1000 हून ऱाऊंड फायरिंग केली. हे गोळीबार वेगवेगळ्या बोअर (315.32) पिस्तुलांद्वारे केले जाते. आतापर्यंत 405 रिकाम्या काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. 18 मृतांचे शवविच्छेदन केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies