जालना । संपामध्ये सहभागी झालेल्या आशा, गटप्रवर्तकांच्या नेमणुका ऱद्द

 सीईओंच्या आदेशाविरुद्ध जिल्हा परिषद कार्यालया समोर ठिय्या आंदोलन

जालना । मानधन वाढीसाठी तीन सप्टेबर पासून बेमुदत संपावर असलेल्या आशा, गट प्रवर्तकांच्या नेमणूका रद्द करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा काढले आहे. त्यामुळे आशा, गट प्रवर्तकांनी जालना जिल्हापरिषद कार्यालय समोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय.

जिल्ह्यातील एक हजार 2502 आशा, गट प्रवर्तकांनी मानधनवाढीसाठी तीन सप्टेंबर रोजी सुरू केलेले काम बंद आंदोलन अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची अनेक कामे खोळंबली आहे. जिल्हयात आरोग्य विभागामार्फत 13 ते 28 सप्टेंबर दरम्यान संयुक्त कुष्ठरोग शोध मोहीम अभियान, सक्रीय क्षयरूग्ण शोध मोहीम आणि असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक जागरूकता अभियान राबविण्यात येत आहे. आशा, गट प्रवर्तकांच्या संपामुळे या मोहिमेला ब्रेक लागला आहे. या अभियानात सहभाग नोंदविला नाही तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी विशेष ग्रामसभा आयोजीत करून पात्र महिलांची निवड करण्याचे सा आदेश गटविकास अधिकाऱ्यांना 13 सप्टेंबर रोजी देण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलक महिला कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून हे धोरण हुकुमशाही स्‍वरूपाचे असल्याचा टिका करत आशा गट प्रवर्तकांनी आंदोलन अधिक तिव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आदेश रद्द न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी संघटनेने दिला आहे.AM News Developed by Kalavati Technologies