आष्टी येथे अतिक्रमणावर बुलडोजर, गाळाधारकांचे पंचायत समितीसमोर उपोषण

तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे.

बीड | आष्टी पंचायत समिती परिसरातील अतिक्रमणावर पंचायत समिती कार्यालयाने 29 तारखेला सकाळी बुलडोजर फिरवला. गाळाधारक आणि पंचायत समिती कार्यालय यांचे प्रकरण गेल्या काही वर्षांपासून न्यायालयात सुरू होते. याविषयी 21 जानेवारी रोजी सुनावणी होणार असताना 19 जानेवारीला ही कारवाई केल्याने व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आज या सर्व व्यवसायिकांचे बेकायदेशीरपणे गाळे पाडल्याने नुकसान झाले आहे. याची भरपाई मिळावी तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे.

आष्टी पंचायत समिती परिसरातील गट नंबर 28 चे मालक दत्तू किसन धोंडे हेच असल्याचे दिवाणी न्यायालयामध्ये सिद्ध झाले होते. परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना बेकायदेशीरपणे चालू व्यवसायांचे गाळे काढून टाकले आहेत. त्यामुळे आज तहसील कार्यालयासमोर सर्वे नंबर 28 मधील पाडलेल्या सर्व गाळ्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देणे, बेकायदेशीरपणे पाडणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणे तसेच त्या ठिकाणी गाळे पूर्ववत करणे. या मागण्यांसाठी व्यवसायिक बेमुदत उपोषणाला बसले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies