बुलडाणा | विदेशातुन परतलेल्या एका विद्यार्थ्याचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्यामुळे तो विद्यार्थी मोकळेपणाने फिरतही होता.

बुलडाणा | 'वंदे मातरम्' मोहिमेअंतर्गत विदेशातून भारतीय मोठ्या प्रमाणात मायदेशी परत आणल्या जात आहेत. त्यात विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. बुलडाणा येथील जे विद्यार्थी फिलिपाईन्सला मेडिकलच्या शिक्षणासाठी गेलेले होते. त्यांना मायदेशी आणण्यात आले आहे. ते 12 मे रोजी बुलढाण्यात आले. आल्यानंतर त्यांना बुलडाणा अर्बन रेसिडेन्सीमध्ये क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. दरम्यान 14 दिवस पूर्ण झाल्याने ते घरी परतले. मात्र त्यानंतर आलेल्या स्वाब रिपोर्टमध्ये एका विद्यार्थ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, तो विद्यार्थी धाड नाका परिसरात राहतो.

त्या विद्यार्थ्याचा रिपोर्ट रात्री उशिरा प्राप्त झाला. तो पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे, विशेष म्हणजे क्वारंटाइन पिरियड पूर्ण झाल्यानंतर इतक्या उशिरा रिपोर्ट येणे व व तत्पूर्वीच स्वॅब घेतलेल्यांना मोकळे करणे, हे मात्र गुंतागुंतीचे वाटत असून याबाबत आरोग्य विभागाकडून अद्याप काहीही स्पष्टीकरण आलेले नाही. त्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्यामुळे तो विद्यार्थी मोकळेपणाने फिरतही होता. दोन दिवसापूर्वी एका हेअर सलूनमध्ये येऊन कटिंगहही करून गेल्याचे कळते. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.AM News Developed by Kalavati Technologies