कन्नड शहरातील लोक वस्तीमध्ये विटभट्ट्यांचे प्रदुषण नागरीक त्रस्त, नागरीकांच्या आरोग्याच्या धोका

विनापरवा धारकांवर कारवाही होणार का ? यांकडे सर्वाचे लक्ष लागले आहे

औरंगाबाद । कन्नड शहरामध्ये लोक वस्तीमध्ये कित्येक वर्षापासुन विट भट्टी व्यवसाय सुरू असुन या व्यवसायामुळे शहरात प्रदुर्षण चांगलेच वाढले आहे. यामुळे नागरी हैराण झाले आहेत. एकीकडे दिल्लीमध्ये प्रर्दूषण प्रश्न चांगलाच पेटला असुन कन्नडमध्ये कुठल्या ही परवाना व गौण खनीजाचा परवाना नसताना विट भट्टीधारक राजरोस पणे माती, टायर, लाकडे, कोळसा इत्यादींचा वापर करून भट्टी सुरू करतात. या मुळे घाण धुराने शहरात प्रर्दुषण वाढल्याने आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. मात्र महसुल विभागातील काही लोक याकडे जाणुन बुजुन कानाडोळा करतात असे नागरीकांकडुन बोलले जाते.

पन्नास ट्रक्टरची ब्रास रॉयलटी ( परवाना ) असतांना शंभर ते सव्वाशे ब्रास साठवणूक करतात. शहराच्या लोक वस्ती मध्ये भट्टी पेटवतात यामुळे प्रर्दुषण वाढते. याकडे महसुल गौण खणीज प्रशासन लक्ष देणार का ? नागरीकांच्या आरोग्यचा खेळ धोका थांबेल का ? विनापरवा धारकांवर कारवाही होणार का ? यांकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.AM News Developed by Kalavati Technologies