BREAKING : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय घेतला असून, हे प्रकरण आता सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

नवी दिल्ली । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय दिला आहे. आता हे प्रकरण सीबीआयकडे सुपुर्द करण्यात आले आहे. सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांचे पालन केले पाहिजे आणि मदत केलीच पाहिजे, असे आदेश देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यापासून मुंबई पोलीस घटनेचा तपास करीत होती. मात्र बिहार पोलीस मुंबईत तपासासाठी दाखल होते. त्यानंतर बिहार पोलीसांना क्वॉरंटाइन करण्यात आले होते. तसेच बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस तपास करत असतांना रोजच नव-नवीन खुलासे येत होते. दरम्यान या प्रकरणी बिहारचे मुख्यमंत्र्यानी सुद्धा सीबीआय चौकशीची मागणी केली होती.AM News Developed by Kalavati Technologies