अजितदादांच्या राजीनाम्यामुळे आमच्याकडेही बहुमत उरलं नाही - देवेंद्र फडणवीस, औट घटकेचं ठरलं सरकार

अजित पवारांनी काही कारणांमुळे राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला- देवेंद्र फडणवीस

मुंबई । प्रचंड नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देत असल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर केलं. तत्पूर्वी, अजित पवारांनीही उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. फडणवीस म्हणाले की, अजित पवारांनीही काही कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आमच्याकडे बहुमत उरलेलं नाही, हे स्पष्ट आहे. यामुळे आता जे कोणी सत्तास्थापन करतील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.

23 नोव्हेंबर रोजी अचानक पणे सकाळी 8च्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सर्वांनाच जबरदस्त धक्का दिला होता. त्यांच्या अचानक शपथग्रहण आणि एका रात्रीतून राष्ट्रपती राजवट उठवण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही  पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारला 24 तासांत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर घडलेल्या अनाकलनीय राजकीय घडामोडींनंतर अजित पवारांनी भाजपची साथ सोडत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अशा प्रकारे फडणवीस सरकार औट घटकेचं ठरून आता महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

दरम्यान, महाविकासआघाडीतील तिन्ही सहयोगी पक्षांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. आता संध्याकाळी 6 वाजता तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत यावर अधिकृत मोहोर उठणार आहे. 24 ऑक्टोबरला निकाल लागल्यानंतर महिनाभराहून अधिक काळ हा सत्तासंघर्ष सुरू होता. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे -

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार असं कधीही ठरलं नव्हतं. न ठरलेल्या बाबींचा बाऊ केला, अनेक दिवस त्यांची वाट पाहिली, पण त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली 

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला- देवेंद्र फडणवीस

महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी होता

शिवसेनेला नंबर गेम लक्षात आला आणि बार्गेनिंग पॉवर वाढल्याचं समजल्याने जे कधीच ठरलं नव्हतं, त्याबाबत सेनेने धमकी दिली, तरीही भाजपने सात्विक भूमिका घेतली. परंतु शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करु लागली

जनतेने भाजपला जनादेश दिला, कारण आम्ही 70 टक्के जागा जिंकलो, तर शिवसेना केवळ 40 टक्के जागांवर विजयी AM News Developed by Kalavati Technologies