मोठी बातमी ! बच्चन पिता-पुत्रांना कोरोना, अमिताभ यांनी स्वत: ट्विट करत दिली माहिती

77 वर्षीय अमिताभ बच्चन यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई । बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचे सुपुत्र अभिनेते अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे. याबद्दलची माहिती स्वत: बिग बी यांनी ट्विट करत दिली. सर्वप्रथम अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. यानंतर त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अमिताभ यांना कोरोनाचे निदान झाल्याचे कळताच त्यांच्या कुटुंबातील सर्व लोक आणि घरात राहणाऱ्या त्यांच्या स्टाफचीही कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. परंतु त्यांचे सुपुत्र अभिनेते अभिषेक बच्चन यांचा अहवाल मात्र आला असून तेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती खुद्द बिग बी यांनी दिली आहे.

अमिताभ यांनी ट्विट केले की, "मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला रुग्णालयात दाखल केले आहे. माझ्या कुटुंबाची आणि कर्मचार्‍यांची चाचणी झाली आहे. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. गेल्या 10 दिवसांत माझ्याशी संपर्क साधलेल्या सर्व लोकांना चाचण्या करवून घेण्याची मी विनंती करतो, असे ट्विट महानायक बच्चन यांनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies