Breaking..! वाढीव वीजबिल संदर्भात आज उच्चस्तरीय बैठक..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विज कंपन्यांचे प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे दिले आदेश

मुंबई । राज्यात वाढीव बिलसंदर्भात अनेकांच्या तक्रारी आल्याने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठक बोलवली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात वाढीव विजबिल आल्याच्या तक्रारी राज्यभरातून आल्या आहे. लॉकडाऊनमध्ये वीजकंपन्यांचे कर्मचारी मीटरची रिडींग घेण्यासाठी आले नसुन, मागच्या रिडींगनुसारच ग्राहकांना वीजबिल आकारण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना विजबिल कंपन्यांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व वीजकंपन्यांचे प्रतिनिधींना बैठकीत बोलावले आहे.AM News Developed by Kalavati Technologies