Breaking! माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचं निधन; वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

निलंगेकर काही दिवसांपुर्वी कोरोनावर मात केली होती; मात्र किडनीच्या आजाराने त्यांचा मृत्यू झाला आहे

पुणे । माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय 91) यांचं आज पहाटे 2 वाजून 15 मिनीटांनी निधन झाले आहे. आज निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. निलंगेकर त्यांना 16 मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी या वयातही कोरोनावर मातदेखील केली पण बुधवारी सकाळी किडनीच्या विकाराने त्यांचं निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. निलंगेकर यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गेल्या महिन्यात त्यांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता आणि त्यांनतर पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आले होते. पण तिथे किडनी विकाराच्या आजाराने त्यांचे निधन झाले आहे. निलंगेकर यांचा राजकीय इतिहास खूप मोठा आहे. 1985 ते 86 दरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री होते. लातूरचा एक शक्तिशाली सहकारी नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यांचे नातू संभाजी पाटील हे भाजपचे आमदार आहेत. संभाजी हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राज्याचे कामगार मंत्री होते.



AM News Developed by Kalavati Technologies