Breaking! मंत्री संदीपान भुमरे यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव; सुपुत्र विलासबापु भुमरे यांना कोरोनाची लागण

मुंबईहून परतल्यानंतर अवस्थ वाटू लागल्याने, कोरोना चाचणी केली असता त्यात विलासबापु भुमरे पॉझिटिव्ह आढळले आहे

पैठण । पैठण येथील जिल्हा परिषदचे माजी सभापती तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे सुपुत्र विलासबापु भुमरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई येथे शुक्रवारी 7 ऑगस्ट रोजी ते महत्वाच्या कामासाठी गेले होते. तेथून आज परतल्यानंतर त्यांना अवस्थ वाटू लागल्यामुळे पैठण येथील सरकारी रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली असता, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे विलास भुमरे यांनी होम आयसोलेशन होण्याचा निर्णय घेतला आहे. संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली व स्वत:च्या कुटुंबाची कोरोनाची चाचणी करून घ्यावी व काळजी घ्यावी. तसेच घरीच राहा, सुरक्षित राहा. असे आवाहनही त्यांनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies