ब्रेकिंग! काँग्रेस नेते तथा माजी आमदार; हर्षवर्धन सपकाळ यांना कोरोनाची लागण

मुंबईहुन परतल्यानंतर सपकाळ यांनी कोरोना चाचणी केली असता, त्यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत

बुलडाणा । बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा कोरोना रिपोर्ट आज सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. सपकाळ हे कालच मुंबईहुन परतले होते. त्यांना ताप आला होता दरम्यान आज; मोताळा तालुक्यात काँग्रेसच्या अनेक जणांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम असल्यामुळे गर्दीत जाण्याआधी संशय नको म्हणून, सपकाळ यांनी कोरोना चाचणी करून घेतली.

त्यावेळी रॅपिड टेस्टींगमध्ये त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. हर्षवर्धन सपकाळ हे मुंबईला अनेक जणांच्या संपर्कात आले होते. त्यात राहुल बोंद्रे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टनूसार सपकाळ यांच्यासोबत राहुल बोंद्रे, आ.अमित झनक, आ.कुणाल पाटील, हैदर यांच्यासोबत नुपाल पाटील यांच्या मरिन ड्राईव्ह येथील घरी निवांत बसलेले दिसतात.AM News Developed by Kalavati Technologies