Breaking..! डोंबिवलीच्या अंबर केमिकल्स कंपनीत मोठा स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही

कंपनी बंद असल्याने जीवितहानी टाळली; कंपनीचा काहीसा भाग कोसळला

मुंबई । कल्याण-डोंबिवली शहरात पुन्हा एकदा एमआयडीसी केमिकल्स कंपनीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोंबिवली एमआयडीसीतील फेज 2 मधील अंबर केमिकल्स कंपनीत स्फोटाचा मोठा आवाज झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आसपासच्या परिसरातील नागरिक सुद्धा हादरले. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. मात्र या स्फोटामुळे कंपनीचा काहीसा भाग कोसळला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कंपनी बंद होती.AM News Developed by Kalavati Technologies