Holi Special : 'रंग बरसे'पासून 'बलम पिचकारी'पर्यंत, या बॉलिवूडच्या गाण्यांशिवाय पूर्ण होत नाही होळी

होळीच्या आनंदाला तडका लावतात होळीची ही खास गाणी

स्पेशल डेस्क | देशभरात होळीची तयारी सुरू झाले आहे. सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. होळी आणि बॉलिवूड यांचं तर विशेष नातं आहे. ज्याप्रमाणे होळी आणि धुळवडीचं नातं रंगांमधून व्यक्त केलं जातं. त्यासोबतच होळीच्या आनंदाला तडका लावण्यासाठी बॉलिवूडची गाणी ही महत्त्वाची ठरतात.

रंगांची खरी मजा होळीवर गाण्यांने येते. आजवर अनेक चित्रपटांमध्ये होळीवर आधारित गाणे तयार झाले आहेत. आजही ही गाणं होळीच्या दिवसांमध्ये ठिकठिकाणी ही गाणी ऐकायला मिळतात. ऐंशीच्या दशकापासून आजपर्यंत होळीवर आधारित अनेक बॉलिवूड गाणी तयार करण्यात आली आहेत. नवीन गाणी आली असली तरीही आजही जुन्या होळीच्या गाण्यांना तेवढेच महत्त्व आहे. आज आपण हेच गाणे पाहणार आहोत.

रंग बसरे गाणे
होळीसाठी हे गाणे खूप प्रसिद्ध आहे. 1981 मध्ये सिलसिला हा सिनेमा आला होता. या गाण्यात अमिताभ बच्चन, रेखा, संजीव कुमार आणि जया बच्चन आहेत. अमिताभ बच्चन यांनी आपल्या आवाजात हे गाणे गायले आहे.

खेलेंगे हम होली
हे गाणए अभिनेता राजेश खन्ना यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. कटी पतंग सिनेमातील हे गाणे आहे. 1971 मध्ये हा सिनेमा आला होता. दिग्गज गायक किशोर कुमार आणिलता मंगशकर यांनी हे गाणे गायले आहे.

अंग से अंग लगाना
डर या चित्रपटातील हे गाणे आहे. अभिनेता शाहरुख खान, जूही चावला, सनी देओल आणि अनुपम खेर यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात अलका याग्निक, विनोद राठोड, सुदेश भोसले आणि देवकी पंडित यांनी गायले आहे. 1993 मध्ये डर हा सिनेमा आला होता.

होली खेले रघुवीरा
हे गाणे आजही लाखो लोकांच्या आवडीचे आहे. अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. बागबान चित्रपटातील हे गाणे आहे. 2003 मध्ये हा सिनेमा आला होता.

होली के दिन
शोले चित्रपटातील हे सुपरहिट गाणे आहे. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी हे गाणे गायले आहे. अभिनेत्री हेमा मालिनी, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies