'मी एक काश्मिरी पंडित आहे...', अनुपम खेर यांचा सत्य परिस्थिती सांगणार व्हिडिओ

30 वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांना त्यांचे वडिलोपार्जित घरांना आणि गावांना सो़डून शरणार्थी शिबीरांमध्ये कशा प्रकारे गेले होते.

मुंबई | 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. मात्र त्यानंतरही भारतातील संघर्ष थांबला नाही. भारतामध्ये अनेक जात, धर्म, पंथाच्या मुद्यावरुन तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यामधील एक संघर्ष म्हणजे काश्मीरी पंडितांसोबत झालेली हिंसा. आता या हिंसेला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. 19 जानेवारी 1989 मध्ये आपल्या हक्काच्या ठिकाणाहून दुरावलेल्या गेलेल्या काश्मिरी पंडितांना आजही त्यांच्या हक्कांपासून वंचित राहावं लागत आहे.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर काश्मिरी पंडितांपैकी एक आहेत. आपल्या समुदायाची झालेली अवहेलनेचे दुःख आठवत त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. यासोबतच आपल्याला न्याय मिळण्याची एक आशाही त्यांनी व्यक्त केली. खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने समाजाला जागं करणारा ठरत आहे.

30 वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांना त्यांचे वडिलोपार्जित घरांना आणि गावांना सो़डून शरणार्थी शिबीरांमध्ये कशा प्रकारे गेले होते. कशा प्रकारे होत्याचं नव्हतं होऊन अनेकांचे बळी गेले होते याचं चित्र अनुपम खेर यांनी शब्दात मांडलं आहे. अनुपम खेर म्हणाले की, 'मी एक काश्मिरी पंडित आहे...', असं म्हणत खेर यांनी जवळपास चार वर्षांपूर्वी या व्हिड़िओचं चित्रीकरण केल्याचं स्पष्ट केलं. पुढे ते म्हणाले की, तेव्हापासून परिस्थिती काही बदललेली नाही. तसंच ही कोणतीही काल्पनिक कथा नाही. 30 वर्षांपूर्वी हे सर्वकाही घडलं आहे. ज्या काश्मिरी पंडितांना एका रात्रीत आपलं अस्तित्विच सोडून निघावं लागलं त्यामध्ये माझेही काही नातलग होते. जे घडून गेलं ते किती हादरवणारं होतं हे जगाला कळायलाच हवं असं ते या माध्यमातून म्हणत आहेत.



AM News Developed by Kalavati Technologies