राजकीय घडामोडींना वेग, भाजपचा राष्ट्रवादीशीही संपर्क?

आम्हाला तोंडघशी पडायचे नाही - भाजप नेता

मुंबई । सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी फक्त काही तास शिल्लक असताना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यातच भाजपच्या एका बड्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की जर शिवसेनेचे सहकार्य केले नाही आणि गरज पडलीच तर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसशीही संपर्क करु, अशा आशयाचे वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे.

'भाजपच्या नेतृत्वाने स्पष्ट केले आहे की, जर आमच्याकडे बहुमत नसेल तर आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही. आम्हाला माहित आहे की आमच्याकडे संख्याबळ नाही. आम्हाला अजूनही आशा आहे की शिवसेना आम्हाला मदत करेल. तसेच 2014 ला राष्ट्रवादीने आम्हाला मदत केली होती. त्यामुळे आम्ही त्यांच्याशीही संपर्क साधू शकतो. जर आम्ही या सर्वांमध्ये अपयशी ठरलो तर सत्ता स्थापनेचा दावा करणे योग्य नाही. आम्हाला तोंडघशी पडायचे नाही.' असे या भाजप नेत्याने सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies