भाजप विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांना 18 जागा देणार - रामदास आठवले

‘राज ठाकरेंना काही उद्योगच नाही’ - रामदास आठवले

भाजप विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांना 18 जागा देणार आहे. त्यापैकी 10 जागा आम्ही चंद्रकांत पाटील यांना लिहून मागितल्या आहेत. अस मत आरपीआयचे अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत मांडले.

10 जागांमध्ये आम्ही पुण्यातील कॅन्टोन्मेंट आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघ मागितले आहे. त्याच बरोबर सत्ता आल्या नंतर आरपीआयला राज्यात एक कॅबिनेट मंत्री पद आणि एक राज्य मंत्री पद देण्यात यावं अशी मागणी आम्ही भाजपकडे केली आहे असं आठवले यांनी सांगितलं. 

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे निगडीत विविध कार्यक्रम सुरु आहेत. रामदास आठवले यांनी आज (शनिवारी)या कार्यक्रमाला भेट दिली.

भाषणादरम्यान आठवले यांनी अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेल्या गीताचा अपभ्रंश केला. त्यामुळे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अपमान झाल्याचे आरोप लहू मुद्रा फाउंडेशनने केला आहे. आठवले यांच्या या वक्तव्यामुळे सर्व समाजाच्या भावना दुखावल्या असून समाज या गोष्टीचा तीव्र निषेध करत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सौंदडे, महेश खिलारे, राजेश आरसूळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

‘राज ठाकरेंना काही उद्योगच नाही’

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील विरोधकांनी एकत्र येत ईव्हीएम विरोधी हाक दिली आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत:च्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा घेत विरोधकांना एकत्र आणले आहे. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यावर उत्तर दिले आहे. ते म्हणाले आहे की, ईव्हीएम विरोधात राज ठाकरे हे देशभरातील नेत्यांची भेट घेत आहे. ईव्हीएम विरोधात आंदोलन केले जाणार आहे. मात्र, त्या आंदोलनाचा काही एक फरक पडणार नाही. अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली आहे.AM News Developed by Kalavati Technologies