औरंगाबादच्या नामकरणावरून भाजप पुन्हा आक्रमक

नामकरणाचा रीतसर ठराव आम्ही महापौरांकडे देतो, मात्र महापौर आमचा ठराव टाळतात - प्रमोद राठोड

औरंगाबाद | औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरून आज भाजपने पुन्हा एकदा औरंगाबाद महानगरपालिकेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. औरंगाबाद चे नामकरण करून संभाजीनगर नाव ठेवावे हा वाद काही मिटता मिटत नाहीये. अगोदर शिवसेना, नंतर मनसे आणि आता भाजप औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावे या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. आज भाजपचे नगरसेवक सभागृहात काळे कपडे परिधान करून आले होते. त्यावरून त्यांनी सभागृहात औरंगाबाद चे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावे अशी मागणी केली आहे. महानगरपालिकेच्या जनरल बॉडीच्या मिटींगमध्ये आम्ही प्रत्येक वेळेस औरंगाबादचे नामकरण करून संभाजीनगर करण्यात यावं असा रीतसर ठराव महापौरांकडे देतो मात्र महापौर आमचा ठराव घेत नाही. असं भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी म्हंटल आहे.AM News Developed by Kalavati Technologies