तेल्हारा नगरपालिकेत भाजप नगरसेविकेचा घागर मोर्चा

पाणी टंचाई निषेधार्थ शेकडो नागरिकांसह काढला भव्य घागर मोर्चा

अमरावती । तेल्हारा नगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. मात्र सत्ता असताना आणि वाहन प्रकल्पात जलसाठा असताना काही भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासंर्भात नगराध्यक्षांसह इतरांनी वारंवार मागणी करूनही अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईचा प्रश्न निकाली न काढल्याने हतबल झालेल्या भाजपच्या नगरसेविका आरती गायकवाड यांच्या नेतृत्वात नगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात आला.

नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या इंदिरानगर भागात अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ही पाणीटंचाई समस्या निकाली काढावी यासाठी वारंवार तोंडी सांगून निवेदन देऊन स्मरणपत्र देऊनही ही समस्या अधिकाऱ्यांनी निकाली काढली नाही. एक महिन्यापूर्वीच नगर परिषद मुख्याधिकारी नगराध्यक्ष पाणीपुरवठा विभाग जिल्हाधिकारी खासदार, आमदार यांना पाणीटंचाईचा प्रश्न निकाली न काढल्याने मोर्चाची माहिती दिली होती. परंतु तरीही पाणीटंचाईचा प्रश्‍न निकाली निघाला नाही. आज तेलारा नगरपालिकेत घागर मोर्चा नागरिकांनी प्रचंड घोषणा दिल्या यावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. यावेळी मुख्याधिकारी मनोहर अकोटकर, नगराध्यक्ष जयश्री फुंडकर, पाणीपुरवठा सभापती महेश राठोड यांच्या खाली खुर्चीला फुलांचा हार घालण्यात आला. मात्र 8 दिवसात प्रश्न निकाली काढला नाहीतर साडीचोळी आणि बांगड्यांचा आहेर करण्यात येईल असा इशारा नगरसेविका आरती गजानन गायकवाड यांनी दिला. यावेळी इंदिरानगर भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार न घडावा यासाठी पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.



AM News Developed by Kalavati Technologies