भाजपा आमदार सुजितसिंह ठाकुर यांना कोरोनाची लागण; कुटुंबातील आणखी 6 जणांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

आमदार ठाकुरसह कुटुंबातील आणखी 6 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, आपणही आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी' ठाकुर यांनी केले आवाहन

उस्मानाबाद । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. उस्मानाबादेतील भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकुर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. आमदार ठाकुर यांच्यासह कुटुंबातील आणखी 6 जणांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला. अशी माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात दिली आहे.

संदेशात त्यांनी लिहले आहे की, 'मी 3 ऑस्टपासून कुणाच्याही संपर्कात आलेलो नाही. मंगळवारी 4 ऑगस्टला कुटुंबातील सर्वांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. त्यानंतर कुटुंबातील 6 सदस्यांचे रिपोर्ट सकारात्मक आले आहे. संपर्कात आलेल्या इतरांची ही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांचे अहवाल हे प्रतीक्षेत आहे. माझ्यासह कुटुंबातील सर्वांची प्रकृती ही चांगली आहे. आपणही आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी' असे आवाहन सुजितसिंह ठाकुर यांनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies