कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात भाजप आक्रमक; चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मोर्चा

कोल्हापूर भाजपच्या वतीने २८ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर । महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफीविरोधात भाजपने एल्गार पुकारला आहे. याची सुरुवात कोल्हापुरातून होणार आहे. सरसकट कर्जमाफीसह मायक्रो फायनान्स कर्जमाफीच्या मागणीसाठी कोल्हापूर भाजपच्या वतीने २८ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

दसरा चौकातून या मोर्चाची सुरुवात होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफीपासून ९० टक्के शेतकरी वंचित राहिले आहेत. अनेक जाचक अटींमुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवताना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळं सरसकट कर्जमाफी, निकषात बदल करण्यासह अन्य मागण्यांचं निवेदन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. या मोर्चात गटतट विसरून हजारो शेतकरी, सेवा सोसायटी, मायक्रो फायनान्स कंपन्या रस्त्यावर उतरतील, असा विश्वास घाटगे यांनी व्यक्त केला.AM News Developed by Kalavati Technologies