शिवसेनला धडा शिकवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर भाजपची नजर

मुंबई महानगर पालिका हे शिवसेनेचं बलस्थान आहे

उमेश करंजकर/मुंबई । नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपला मिळूनही विरोधी पक्षात बसायची वेळ भाजपवर आली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज होत आहे. दादरच्या वसंतस्मुर्ती कार्यालयात संघटनात्मक बैठक पार पडली असून या बैठीकाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री आशिष शेलार, गिरीश महाजन उपास्थित होते.

या बैठकीत संघटनात्मक पदाधिकारी आणि मुंबईच्या 227 वार्डचे अध्यक्ष, 36 विधानसभा अध्यक्ष आणि सहा लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष यांना ही बोलावण्यात आले होते. या सर्व अध्यक्षाच्या फेर निवडीचा विचारही या बैठकीत करण्यात आली असल्याची माहिती माजी मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. मुंबईतील 227 वार्डच्या कामाला सुरुवात पक्षाकडून लवकरच केली जाणार असल्याची माहितीही यावेळी आशिष शेलार यांनी दिली आहे. मुंबई महानगर पालिका हे शिवसेनेचं बलस्थान आहे. या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जात सत्ता स्थापन केल्याने भाजपच्या हातातोंडाशी आलेली सत्ता गेली. त्यामुळे महानगरपालिकेची सत्ता आपल्या हातात घेऊन शिवसेनेला धडा शिकवण्याचा इरादा भाजपचा आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागांवर विजय मिळाला होता. मात्र आता मुंबई महापालिकेवर भाजप ची सत्ता आणण्याचा निर्धार या बैठकीतून करण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies