भाजप नेते किरीट सोमय्यांना कोरोनाची लागण

किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबई | भाजपचे धडाडीचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची पत्नी मेधा सोमय्या यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून या दोघांनाही सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे. मी व माझी पत्नी यांना कोरोनाची लागण झाली असून आमच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात किरीट सोमय्या यांनी मुंबईतील अनेक भागांनी भेटी दिल्या होत्या. त्यांनी सातत्याने सरकारी रुग्णालयांतील दुरावस्था आणि अपुऱ्या वैद्यकीय सुविधांच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला लक्ष्य केले होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात किरीट सोमय्या सातत्याने चर्चेत होते. मात्र, सतत बाहेर फिरत असल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुजितसिंह यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती आज समोर आली होती. त्यांच्या घरातील ६ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, तिघांचे चाचणी अहवाल अद्याप यायचे आहेत. माझ्यासह सर्वांची प्रकृती चांगली आहे. काळजी घेतो आहे. आपणही घ्या, असे त्यांनी सांगितले होते.AM News Developed by Kalavati Technologies