राममंदिराच्या भूमिपूजनप्रसंगी सर्व मंदिरे खुली करा, भाजप नेते बबनराव लोणीकरांची मागणी

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपजूनप्रसंगी राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत अशी मागणी माजी मंत्री तथा भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

जालना | अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपजूनप्रसंगी राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत अशी मागणी माजी मंत्री तथा भाजपनेते बबनराव लोणीकर यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. पाचशे वर्षानंतर जगभरातील हिंदूंना न्याय मिळालाय. त्यामुळे जगभरातील हिंदू आनंदोत्सव साजरा करणार आहेत. अशा प्रसंगी कायद्याच्या चौकटीत राहून व कोरोनाची योग्य काळजी घेऊन भक्तांना सर्व मंदिरांत दर्शनाची सोय करावी अशी मागणी लोणीकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्यपालांना लिहलेल्या पत्रात लोणीकरांनी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात बंद करण्यात आलेले धार्मिक स्थळे, कायद्याच्या चौकटीत राहून व नियमांचे पालन करुन खुली करण्यात यावी, तसेच राममंदिराचा भुमिपुजनाचा कार्यक्रम घरबसल्या टीव्हीवर बघता यावा यासाठी वीजपुरवठा खंडित होता कामा नये याबाबत आपण सरकारला सूचना द्याव्यात अशी विनंती पत्रकाद्वारे केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies