भाजपा नगरसेविकेकडून पूरग्रस्त, कार्यकर्ते आणि पत्रकारांना मारहाण

कॅम्पमध्ये सुविधा नाहीत असा आरोप करत गुंडांनी मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण केली

सांगली | सांगलीत मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते पूरग्रस्त नागरिकांना मदत करत असताना कॅम्पमध्ये भाजपच्या नगरसेविका आणि काही गुंडांनी येऊन मराठा कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी धावणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबरच पत्रकारांनाही मारहाण करणात आली आहे. मराठा सेवा संघाच्या कॅम्पमध्ये सुविधा नाहीत असा आरोप करत गुंडांनी मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई करत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies