बिल गेट्सने मायक्रोसॉफ्ट सोडले, आता पुढे करणार हे काम

बिल गेट्सने मायक्रोसॉफ्ट बोर्ड ऑफ डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला आहे

नवी दिल्ली |  बिल गेट्सने मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती टेक ऑफ मायक्रोसॉफ्ट कंपनीने जाहीर केले आहे. बिल गेट्सला सामाजिक कार्यात वेळ द्यायचा असल्याने कंपनी सोडत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच मायक्रोसॉफ्टने गेट्स यांना जागतिक आरोग्य आणि शिक्षणासाठी अधिक काम करण्यास उत्सुक असल्याने त्यांनी राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले आहे. 64 वर्षीय बिल गेट्सने जवळजवळ एक दशकापूर्वी कार्यालयातील कंपनीच्या कामात दररोजचा सहभाग घेणे सोडले होते. त्यानंतर गेट्स मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून काम पाहत होते. पण सामाजिक कार्यात त्यांना वेळ देता येत नसल्याने त्यांनी कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कंपनीचे दिग्गज सत्य नाडेला यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “इतकी वर्षे बिल गेट्स बरोबर काम करणे आणि शिकणे हे मोठ्या सन्मान आणि विशेषाधिकारांची बाब आहे.” गेट्स तांत्रिक सल्लागार म्हणून कंपनीशी संबंधित असतील आणि आम्ही त्यांच्याकडून सल्ला घेत राहू असेही नाडेला यांनी म्हंटल आहे. बिल गेट्सचे नाव नेहमी जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत असते. त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षापासून प्रोग्रामिंग सुरू केले होते.AM News Developed by Kalavati Technologies