पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या निवडणुकीत NDA ला बहुमत मिळाले आहे. NDA ला 125 तर महागठबंधनचे 110 उम्मेदवारांनी विजय प्राप्त केला आहे. NDA ने 125 सीटांवर विजय प्राप्त केला असून, बहुमतासाठी लागणारा आकडा त्यांनी पार केला आहे. तेजस्वी यादव यांच्या RJD पक्षाचे 75 उम्मेदवार विजयी झाले असून, बिहारमधील सर्वात मोठी पार्टी म्हणून मान मिळवला आहे. तर बीजेपीचे 74 उम्मेदवार निवडून आले असून, दुसऱ्या क्रमांकाची पार्टी म्हणून बीजेपीला स्थान मिळाले आहे.
निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये सत्ताधारी NDA सोबत असलेल्या बीजेपीने 74 जागांवर, जेडीयूने 43 जागांवर, विकासशील इंसान पार्टीने 4 जागेवर आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चाने 4 जागांवर विजय प्राप्त केले आहे.तर दुसरीकडे महागठबंधनात समाविष्ट असलेले RJD ने 75, काँग्रेसने 19, भाकपा मालेने 12, माकपा अॅण्ड भाकपाने प्रत्येकी 2-2 जागेवर निवडून आले आहे. तर MIM पक्षाचे सुद्धा 5, लोजपा आणि BSP चे प्रत्येकी एक-एक उम्मीदवार निवडून आले आहे. तर एका जागेवर अपक्ष उम्मेदवार निवडून आला आहे.