Bihar Election Result 2020: बिहारमध्ये एनडीएला मोठी आघाडी, बहुमताचा आकडा गाठला

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 3 टप्प्यात मतदान झाले असून, आज 38 जिल्ह्यातील 55 मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू झाली आहे.

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागत असून संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. बिहारच्या 3 कोटींहून अधिक मतदारांसह 3734 उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. निकालाचा पहिला कल हाती आला असून एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. एनडीएने बहुमताकडे झेप घेतली असून, महागठबंधनेसुद्धा 112 जागांवर आघाडी घेतली आहे.

243 जागांसाठी आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणीपासून एनडीएने आघाडी घेतली आहे. एनडीएने 125 जागांवर आघाडी घेतली आहे. तर महागठबंधन 109 जागावर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. पण, मतमोजणीचे चित्र बदलल्यामुळे एनडीएने आघाडी घेतली आहे. त्यामुळे महागठबंधनला धक्का मानला जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies