बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; तीन टप्प्यात पार पडणार मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी जाहीर केली असून, मतदान तीन टप्प्यांमध्ये पार पाडले जाणार आहे

नवी दिल्ली । बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारीखा आज जाहीर करण्यात आल्या. राज्यात तीन टप्प्यात निवडणूक पार पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. येत्या 28 ऑक्टोबरला पहिल्या, 3 नोव्हेंबरला दुसऱ्या तर 7 नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यांमध्ये मतदान पार पाडले जाणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 71, दुसऱ्यात 94 तर तिसऱ्यात 78 जागांसाठी मतदान पार पाडले जाणार आहे. तर या सर्व टप्प्यातील निवडणुकींचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत दिली आहे. मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की,"बिहारमध्ये एकूण 243 जागांसाठी मतदान होत आहे. त्यामधून 38 जागा अनुसूचित जाती आणि 2 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आली आहे"

दरम्यान, देशात कोरोनाचा कहर कायम आहे आणि अशातच बिहार विधानसभा निवडणुक पार पाडली जात असल्याने, राज्य निवडणुक आयोगाला 6 लाख पीपीई किट वितरीत करण्यात येणार आहे. तर 46 लाखांहुन अधिक मास्क आणि सॉनिटाइजरचा सुद्धा वाटप करण्यात येणार आहे. तसेच पक्ष आणि कार्यकर्त्यांना व्हर्च्यु्ल पद्धतीने निवडणुकीचा प्रचार करावा लागणार आहे. तसेच उमेदवाराला सभा घेता येणार नसल्याचंही निवडणुक आयोगानं स्पष्ट केलं आहे.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: