मोठी बातमी! राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे

मुंबई । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी कोरोना होण्याचे सत्र सुरूच आहे. नुकतेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं असून, त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता त्यात त्यांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतःला आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.' असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies