लॉकडाऊन 5 ची घोषणा; कंटेन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत टाळेबंदी

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊन 5.0 ची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊन 5.0 ची घोषणा केली आहे. आता देशात कंटेंन्मेंट झोनमध्ये 30 जुनपर्यंत टाळेबंदी करण्यात आली आहे. मात्र जे भाग कंटेंन्मेंट झोनमध्ये येत नाही अशा भागात 8 जुनपासून अटीशर्तीसह काही दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे. हे दिशानिर्देश 1 जून ते 30 जून पर्यंत सुरू राहतील. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार रात्री 9 ते सकाळी 5 या वेळात कर्फ्यू असणार आहे. असं असलं तरी या कर्फ्यूमधून अत्यावश्यक सेवांच्या दुकानांना सुट असणार आहे. तसेच शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक संस्था सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारवर सोपवला आहे.

काय उघडेल आणि काय बंद राहील

नवीन सूचना 1 जून 2020 पासून अंमलात येतील आणि 30 जून, 2020 पर्यंत लागू होतील.

24 मार्च 2020 नंतर देशभरात पुर्णपणे लॉकडाउन लागू करण्यात आले. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. इतर सर्व कामांवर बंदी घालण्यात आली होती.

पूर्वी बंदी घातलेली सर्व बंधने आता कंटेनमेंट झोनच्या बाहेरील भागात टप्प्याटप्प्याने उघडले जातील.

पहिल्या टप्प्यात काय उघणार 

8 जूनपासून पूजास्थळे उघडली जातील, हॉटेल, रेस्टॉरंट उघडले जाईल, शॉपिंग मॉल्स उघडली जातील.

दुसऱ्या टप्प्यात काय उघणार
 
जुलैमध्ये सर्व संबंधित पक्षांशी शाळा महाविद्यालये उघडण्यासाठी इत्यादींशी बोलण्याचा निर्णय घेण्यात येईल.

तिसऱ्या टप्प्यात या सेवा सुरू होणार

स्थितीचे मूल्यांकन आणि निर्णय घेण्यात येईल, आंतरराष्ट्रीय उड्डाण, मेट्रो, सिनेमा हॉल, जिम, थिएटर, बार, सामाजिक, राजकीय, खेळ, धार्मिक कार्यक्रम आदी.AM News Developed by Kalavati Technologies