मोठी बातमी ! भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू

माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला असून, त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे

नवी दिल्ली । भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कपिल देव यांच्यावर हृदयात ब्लॉकेजमुळे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांना अचानक छातीत दुखू लागल्याने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या दिलेल्या माहितीनुसार, कपिल देव सध्या धोक्याच्या बाहेर असून, त्यांना आयसीयू विभागात ठेवण्यात आले आहे. 37 वर्षांपूर्वी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. कपिल यांना हृदयविकार झाल्याची माहिती त्यांच्या चाहत्यांना कळताच सोशल मीडियावर त्यांचे चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करीत आहे.AM News Developed by Kalavati Technologies