मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

मुंबई । राज्यात कोरोनाचा वेग जरी मंदावला असला तरी, कोरोना होण्याचे सत्र सुरूच आहे. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वीच त्यांना ताप, सर्दी, खोकलाचा त्रास जाणवत होता त्यामुळे ते स्वत: विलगीकरणात गेले होते. त्यांनी त्यांची कोरोनाची चाचणी केली असता त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाने यासंबंधी माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवासांपासून त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यादरम्यान त्यांनी कोरोना चाचणी केली होती. मात्र त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून ते स्वत: होम क्वारंटाईन झाले होते. मात्र त्यांनी दुसऱ्यांदा कोरोनाची टेस्ट केली असता त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies