मोठी बातमी! काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण

काँग्रेसचे जेष्ठ नेते एच.के.पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून, संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करून घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे

मुंबई । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. कोरोना या भयावह विषाणूनं राज्यात सुमारे 13 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय मंडळींना सुद्धा कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. नुकतेच काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एच.के.पाटील हे मागील आठवड्यात मुंबईला बैठकीला गेले होते. त्याबैठकीत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख यांच्यासह अनेक जण बैठकीला उपस्थित होते.

मुंबईवरून परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ जाणवत होते. त्यांनंतर त्यांनी आपली कोरोनाची चाचणी केली असता, त्यात ते पॉझिटिव्ह आले आहे. संपर्कात आलेल्या प्रत्येकांनी आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान याआधी धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: