मोठी बातमी! भाजपच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

मोठी बातमी! भाजपच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

कल्याण । राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अगदी सर्वसामान्यांपासून राजकीय मंडळींना सुद्धा कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. नुकतचं कल्याण-डोंबिवली पूर्व विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांना कोरोनाची लागल झाली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून, ते विलगीकरणात गेले आहे. डॉक्टरांच्या सल्लानुसार त्याच्यांवर घरीच उपचार सुरू असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोना या भयावह विषाणूनं सर्वसामान्यांपासून, आमदार, नगरसेवक यांना सुद्धा ग्रासलं आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता कल्याण-डोंबिवलीकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.AM News Developed by Kalavati Technologies