मोठी बातमी! खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण

नवनीत राणा यांच्यासह  कुटुंबातील 10 सदस्यांना कोरोनाची लागण; कुुटुंबाला मोठा धक्का

अमरावती । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांचे पती आमदार रवी राणा आणि आणि कुटुंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार नवनीत राणा यांच्यासह  कुटुंबातील 10 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. यामध्ये राणांच्या मुलांचाही समावेश आहे. आणि आज नवनीत राणा यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. खासदार नवनीत राणा यांनी फेसबुकवरून कोरोना झाल्याची माहिती दिली.

''माझी मुलगी व मुलगा असे दोघेही व इतर कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले, एक आई म्हणून यांची काळजी घेणे माझे आद्यकर्तव्य होते. मुलामुलींची व कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेता-घेता मला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आप-आपली टेस्ट करून घ्यावी. घरीच राहा, सुरक्षित राहा, शासन निर्देशांचे पालन करा असे आवाहन करत असतांनाच आपले आशीर्वाद व सदिच्छा यांचे बळावर आम्ही कोरोनावर मात करू अशी मला आशा आहे.''
अशी पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुकवर केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies