एका घड्याळासाठी तब्बल 222 कोटींची लागली बोली, कारण...

लिलावात विकले गेलेले आतापर्यंतचे सर्वात महागडे मनगटी घड्याळ

नवी दिल्ली । जिनिव्हा येथील एका चॅरेटी लिलावात पटेक फिलिपच्या एका घड्याळासाठी तब्बल 222 कोटी रूपये बोली लागली. लिलावात विकले गेलेले आतापर्यंतचे सर्वात महागडे मनगटी घड्याळ आहे. ख्रिस्टिनी या लिलाव कंपनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या चॅरेटी लिलावाचा हेतू ड्येचेनी मस्क्यूलर डिस्ट्रोपीच्या (स्नायूंचा आजार) संशोधनासाठी मदत करणे हा होता. यामध्ये पटेक, ऑडेमार्स पिगेट आणि एफ.पी. जॉर्न या कंपनीची घड्याळ लिलावासाठी होती. एवढी मोठी बोली लावणाऱ्या खरेदीदाराचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. पटेक फिलिफ ग्रँडमास्टर चेम रेफ्रेंस नंबर 6300ए-010 ही एकमेव असे घड्याळ आहे जे स्टेनलेस स्टिलचा वापर करून बनविण्यात आलेले आहे. यामध्ये एक मिनिट रिपिटर, फोर-डिजिट कँलेंडर, सेंकड टाइम झोन आणि 24 तास मिनिट सबडाइल सारखे फीचर्स आहेत. या घड्याळाची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात पुढील व मागील डाइल्समध्ये एक सॅल्मोन कलर आणि दुसरे ब्लॅक कलर आहे. याआधी Rolex Daytona च्या नावावर सर्वाधिक महागड्या घड्याळाचा रेकॉर्ड होता. जे 2017 मध्ये 17.8 मिलियनला खरेदी करण्यात आले होते.AM News Developed by Kalavati Technologies