भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या करण्यापुर्वी अनुपमा पाठक यांच्या घरात एक सुसाईड नोट मिळाली आहे

मीरा भाईंदर | भोजपुरी सिनेसृष्टीत काम करणारी सिनेअभिनेत्री अनुपमा पाठक हिने मिरारोड मधील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नेमकी आत्महत्या का केली याचा तपास काशीमीरा पोलीस करत आहेत.

भोजपुरी सिनेअभिनेत्री अनुपमा पाठक (40) ही मुंबईच्या प्रवेशद्वार दहिसर चेकनाका जवळील काशीमिरा परिसरात म्हाडा बिल्डिंग मध्ये 1802 यामध्ये भाडेतत्त्वावर राहत होती. तिने एक सुसाईड नोट लिहून ठेवत त्यामध्ये एका मनीष झा या व्यक्तींचे नाव व एका विझिटम प्रोड्युसर कंपनी यांचे नाव आहे. त्यावरून पोलिसांनी प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करत यानंतर पोलिसांनी यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गुन्हा नोंद केला.

मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आपली एक्टिव्हा गाडी लॉकडाऊनच्या काळात तिने आपल्या मूळ गावी जाताना आपल्या मित्राला देऊन गेली. मात्र परत आल्यानंतर त्यांनी गाडी देण्यास नकार दिला. व तिने विझीटम प्रोड्युसर कंपनीकडे गुंतवलेले पैसे 2019 मध्ये परत मिळायचे होते, मात्र ते देखील भेटले नाहीत म्हणून अडचणीत होती. हाताचे काम गेले म्हणून तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून तिने आत्महत्या केली व त्यात तिने एक सुसाईड नोट लिहिली त्यात एका व्यक्तीचे व एका प्रोड्युसर कंपनीचे नाव लिहून आत्महत्या केली आहे. तसेच गळफास घेण्यापूर्वी तिने फेसबुक लाईव्ह करीत कोणावरही विश्वास करू नका असे सांगितले आहे. नेमकं आत्महत्या करण्याचं करण काय आहे याचा सखोल तपास काशीमीरा पोलीस करत आहे.

शेजारी राहणाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अनुपमा पाठक यांच्या घरात एक सुसाईड नोट मिळाली आहे त्या आधारे पुढील तपास सुरु असल्याची माहिती काशीमीरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चंदनकर यांनी दिली.AM News Developed by Kalavati Technologies