Bhiwandi Building Collapse: ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 'त्या' तरुणाचा मोबाईल व्हिडीओ व्हायरल

21 सप्टेंबर रोजी मुंबईतील भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली होती, ढिगार्‍याखाली अडकलेल्या तरुणाला बाहेर काढण्यास एनडीआरएफला यश आले असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

मुंबई । ठाण्यातील भिवंडीत 21 सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता तीन मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत 41 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. एनडीआरएफच्या टीमला आतापर्यंत 19 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. यातच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका तरुणानं केलेला मोबाईल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिलानी इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरूच आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीने मोबाईल टॉर्चच्या मदतीने आपण जिवंत असल्याचा इशारा दिला होता.

तरुणाचा ढिगाऱ्याखालून आवाज आल्यानं एनडीआरएफच्या जवानांनी संबंधित व्यक्तीला धीर देऊन त्याला सुखरूप बाहेर काढले होते. खालिद खान असे या तरुणाचे नाव असून या घटनेत त्याने आपला भाऊ व पुतण्या गमावला आहे.या इमारत दुर्घटनेनंतर खालिद खान हा तब्बल दहा तास ढिगार्‍याखाली अडकला होता. या ढिगाऱ्याखाली अडकल्यानंतर मृत्यू अटळ असताना खालिद खानने धीर धरत आपली हिम्मत खचू दिली नाही. काही वेळानंतर खालिद शुद्धीवर आला. आपल्याला कोणी मदत करण्यासाठी येईल, याची वाट तो पाहत होता. तेवढ्यात त्याला NDRFने हाक मारली व त्यानंतर खालिदला बाहेर काढण्यात आले.AM News Developed by Kalavati Technologies