भीमा कोरेगाव व मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे, नाणार आंदोलनातील केवळ...

कोरेगाव-भीमा प्रकरणातील 348 गुन्हे मागे

मुंबई । कोरेगाव-भीमा प्रकरणातील 348 गुन्हे मागे घेण्यात आले असून मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे घेण्यात आल्याचं सांगतानाच शेतकरी आंदोलनातील गुन्हेही लवकरच मागे घेण्यात येतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तसेच आपल्याविरोधीतील बाजू असणाऱ्यांना तत्कालीन फडणवीस सरकारने शहरी नक्षलवादी संबोधल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तसेच या प्रकरणातील इतरही अनेक गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

त्याचबरोबर, मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणातील 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. या प्रकरणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि पोलिसांवरील हल्ल्यांसारख्या गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असेही देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली होती. मात्र आज विधान परिषदेत उत्तर देताना देशमुख यांननी नाणार आंदोलनातील केवळ तीनच गुन्हे मागे घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं. शेतकरी आंदोलनातील गुन्हेही मागे घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं.AM News Developed by Kalavati Technologies