बेळगाव । तिहेरी हत्याकांडातील चार आरोपींना अटक

बैलहोंगल दोडवाड हत्याकांड जमिनीच्या वादातून झाल्याचे उघड

बेळगाव (विठ्ठल पवार) । बेळगांव जिल्यातील बैलहोंगल तालुक्यातील दोडवाड गावात झालेल्या तिहेरी हत्या प्रकरणी बेळगाव पोलिसांनी आज चारही संशयित आरोपींना अटक केली आहे. 1)शिवाप्पा बसाप्पा भगवंतनावर 2)गोविंद संगोळी 3) मल्लिकार्जुन आंदानशेट्टी 4) बसवंताप्पा आंदानशेट्टी या चारही आरोपीना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. 12 एकर जमीन वादातून ही हत्या झाल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली आहे.  दोडवाड गावात एकाच कुटुंबातील तिघा जणांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली होती. तालुका पंचायत माजी सदस्य 1) शिवानंद आंदानशेट्टी (60) 2) पत्नी शांतव्वा (40) 3) मुलगा विनोद (26) हे घरात झोपेत असताना काही चार पाच अज्ञातांनी त्यांच्या घरात घुसून आणि कोणालाही काही कळायच्या आधी त्या तिघांवर धारदार शस्त्राने व रॉडने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मृत कुटुंबियांना स्वतःचा बचाव करता आला नाही.

या हल्यात त्या तिघांचा जागीच मृत्यू झाला मयत विनोद याचा 30 जानेवारी रोजी विवाह ठरला होता. पण तो बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याचा खून झाला हत्येच्या दिवशी मुख्य आरोपी शिवाप्पा व विनोद जेवण करून झोपी गेले त्यानंतर एका ट्रॅक्टर ट्रेलरच्या लोखंडी रॉडने शिवाप्पाने पहिला विनोदच खून केला व त्यानंतर बाजूला खाली झोपी गेलेल्या शिवानंद आणि त्यांची दुसरी पत्नी शांतव्वा यांची हत्या त्याच रॉडने केली असल्याचे समजते. शिवानंद आणि त्यांची पहिली पत्नी कस्तुरी त्यांना मुलबाळ नव्हते कस्तुरी ही देखील त्याच गावात राहत होती. या जोडप्याने शिवाप्पाला मुलगी म्हणून वाढवले पण सर्व जमीन मृत मुलगा विनोद याच्याच नावावर होती. त्यामुळे मालमत्ता मिळाली नसल्याने द्वेषाने हत्या करण्याचा कट रचला.AM News Developed by Kalavati Technologies