बीड जिल्ह्याला आणखी धक्का, आज 6 रुग्ण वाढले, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 47 वर

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 47 वर जाऊन पोहोचली आहे.

बीड | जिल्हा रुग्णालयातुन काल 40 स्वॅब पाठवण्यात आले होते. त्यात 6 पॉझिटिव्ह तर 33 निगेटिव्ह आले आहेत. तर 1 इन्क्लुझिव्ह आलेला आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असल्याचे दिसत आहे. तर आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 47 झाला आहे.

आज जिल्हा रुग्णालयातुन तपासणीसाठी 40 स्वॅबचे नमुने पाठवण्यात आले. कालच्या 43 पैकी 3 पॉझिटिव्ह तर 39 निगेटिव्ह तर 1 इन्क्लुझिव्ह आलेला आहे. त्यासह 41 अहवालाची आज प्रतिक्षा होती. काल आलेल्या तीन पॉजिटिव्ह रुग्णांपैकी बीड शहरातील पालवन चौक भागात असलेला पॉझिटिव्ह रुग्ण 9 पोलिसांसह तब्बल वीस जणांच्या संपर्क आला होता. 9 पोलिसांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. तर आणि संशयितांचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब पाठवले होते. त्यामुळे पुन्हा बीड जिल्ह्यातील रुग्ण वाढतील असा अंदाज काढला जात होता. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 47 वर जाऊन पोहोचली आहे.AM News Developed by Kalavati Technologies