सावधान! रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या क्रमांकावर, आकडेवारीने वाढवली देशाची चिंता

देशाचा पॉझिटिव्ह रेट हा 13.42 टक्के, 24 तासात देशात 24 हजार 248 नवीन रुग्ण

दिल्ली । भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर हा सुरुच आहे. वाढत चाललेली रुग्णसंख्या ही देशासाठी चिंतेची बाब ठरत आहे. जगभराच्या आकडेवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशात 24 हजार 248 नवीन रुग्ण आढळलेले आहे. तर 425 कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यासह भारतातील कोरोना रुग्णाचा आकडा हा 7 लाखांच्या घरात गेला आहे. देशात सद्यस्थितीला 6 लाख 97 हजार 413 रुग्ण आहे. तर आतापर्यत 19 हजार 693 जणांचा दुर्दैवाने मृत्यु झाला आहे. देशाचा पॉझिटिव्ह रेट हा 13.42 % आहे. तर दिवसेंदिवस रुग्णसंख्या ही वाढतच चालली आहे. त्यामुळे देशात अनेक भागात टाळेबंदी केली जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies