मोदी सरकारच्या एका निर्णयामुळं चीनला मोठा दणका, एकट्या टिकटॉक कंपनीला कोट्यावधी डॉलर्सचे नुकसान

टिकटॉकला भारतात बंदी घातल्यानंतर 4500 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

नवी दिल्ली | गलवान खोऱ्यात चीनने केलेली कुरापत त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे. चीनी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर संपुर्ण भारतात चीनच्या कुरापतीवर संतापाची लाट उसळली होती. अनेक भारतीयांनी या घटनेनंतर चीनी वस्तूंवर बंद घालण्याची मागणीही केली होती. तर अनेक ठिकाणी चीनी वस्तूंची होळी करण्यात आली होती.

अशातच मोदी सरकारने चीनचे तब्बल 59 Apps बॅन करुन चीनला मोठा दणका दिला आहे. टिकटॉक, शेअर इट सारख्या इतर चीनी App ला भारतात बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळं चीनी कंपन्यांना मोठा दणका बसला आहे. चीनच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एकट्या टिकटॉकला भारतात बंदी घातल्यानंतर 4500 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

TikTok App चे सर्वाधिक वापरकर्ते भारतात असल्याने चीनला हा मोठा धक्का मानला जात आहे. भारत सरकारने राज्यांचे ऐक्य, संरक्षण आणि सुरक्षा लक्षात घेऊन या सर्व App वर बंदी घालण्याचा आदेश जारी केला होता. बंदी घातलेल्या अ‍ॅप्समध्ये टिकटॉक, शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप, तसेच डीयू रेकॉर्डर, विगो व्हिडिओ, लाइक, हॅलो यासह अनेक लोकप्रिय चिनी अॅप्स समाविष्ट आहेत. AM News Developed by Kalavati Technologies