बाळासाहेब ठाकरे यांचे आज सातवे पुण्यस्मरण, शिवसैनिक शिवाजी पार्कवर

शिवसेना यानिमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. या निमित्त आज, रविवारी शिवाजी पार्क येथे त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक दाखल होणार आहेत. त्यामुळे शनिवारपासूनच शिवसेनेतर्फे शिवाजी पार्क येथे तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवसेना यानिमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे राज्यातील सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भेट देणार की, समान विचारधारेवर गेली 25 वर्षे युतीत असलेल्या भाजपचे नेते हजेरी लावणार, याबाबतही राजकीय क्षेत्रात विविध चर्चां रंगल्या आहेत. 

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाला भेट देऊन नतमस्तक होतात. राज्यात गेल्या पाच वर्षांत युतीची सत्ता असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर भाजप नेते या ठिकाणी जाऊन आदरांजली वाहत असत. मात्र सध्या शिवसेना व भाजप यांच्यातील वाद टोकाला पोहोचेला आहे. या वादानंतर आता भाजप नेते या स्मृतिस्थळाला भेट देतील का याबाबत राजकीय क्षेत्रात संभ्रम आहे.AM News Developed by Kalavati Technologies