"बाबरी मस्जिद होती आणि राहणार" अयोध्येतील सोहळ्याआधीच ओवेसींचे ट्विट

ओवेसी यांनी बाबरी मस्जिदीचे दोन फोटो ट्विट केले असून, बाबरी जिंदा है असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी 12 वाजता अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. मंदिराच्या भूमिपूजनाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असतानाच एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी मस्जिदीसंदर्भात एक ट्विट केलं आहे. ओवेसी यांनी बाबरी मशिदीचे दोन फोटो ट्विट केले असून, बाबरी जिंदा है असं म्हटलं आहे. आज भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या दिवशीच ओवेसींनी सकाळीच ट्विटवरुन बाबरीचे दोन फोटो ट्विट केले आहेत.

“बाबरी मस्जिद होती, आहे आणि राहणार इन्शाअल्लाह”, असं ट्विट ओवेसींनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बाबरीच्या एका जुन्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटोबरोबरच रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान बाबरी मशिदीची वास्तू पाडण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोनादरम्यानचाही फोटो ट्विट केला आहे. ओवेसी यांनी #BabriZindaHai हा हॅशटॅग वापरल्यानंतर तो टॉप ट्रेण्डमध्ये आला आहे. अनेकांनी बाबरीसंदर्भातील ट्विट केलं असून ओवेसींचे ट्विटही चांगलेच व्हायरल झाल्याचे पहायाला मिळत आहे.AM News Developed by Kalavati Technologies