राम जन्मभूमी भूमिपुजन; पंतप्रधान मोदी लखनऊमध्ये दाखल, थोड्याच वेळात अयोध्येत पोहचणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराच्या ऐतिहासिक भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराच्या ऐतिहासिक भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. आज दुपारी 12.30 वाजता हा सोहळा पार पडेल. या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे. या द्वारेच निमंत्रितांना भूमिपूजनाच्या स्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान, भूमिपूजनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून निमंत्रितही या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies